व्यापम घोटाळा: न्यायालयाने खाजगी महाविद्यालयाच्या सचिवाचा जामीन फेटाळला

इंदौर: येथील विशेष सत्र न्यायालयाने आज व्यापम घोटाळ्याशी संबंधित एका गैरव्यवहारात आरोपी असलेल्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सचिवाचा जामीन फेटाळला. विशेष न्यायाधीश समरेश सिंग यांनी आरोपी विनोद भंडारी याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अंमलबजावणी संचानालयाने विनोद भंडारी यांच्या खटला दाखल केला होता.

अंमलबजावणी संचानालयाने सांगितले की, भंडारी हे श्री अरबिंदो इन्स्टिटयूट ऑफ मेडीकल सायन्स अँड मेडीकल कॉलेज (एसएआयएमएस)चे सचिव होते जेव्हा विद्यार्थी भरती प्रक्रियेचा घोटाळा झाला जो व्यापम (मध्यप्रदेश प्रोफेशनल एक्सामिनेशन बोर्ड) घोटाळा म्हणून ओळखला जातो.

-Ads-

भंडारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात घुसखोरी, चुकीच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळवून देणे, यासंबंधीचा त्यांच्यावर खटला दाखल आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी संचानालयाचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी या मार्फत कमाविलेल्या काळ्या पैश्याने ७ कोटी रुपयांची मालमता देखील खरेदी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)