सीव्हीसी अहवालात वर्मांना क्‍लिन चिट नाही 

सोमवारपर्यंत उत्तर देण्याची सुप्रिम कोर्टाची सुचना 

नवी दिल्ली – सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावरील केंद्रीय दक्षता आयोगाचा प्राथमिक अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्या अहवालातील काहीं बाबी वर्मा यांना अनुकुल आहेत, काही बाबी काहीशा प्रतिकुल आहेत तर काही बाबी पुर्ण प्रतिकुल आहेत. त्यामुळे त्याच्या अधिक चौकशीची गरज आहे असा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे. या विषयी वर्मा यांनी येत्या सोमवारपर्यंत उत्तर द्यावे. त्याचा अभ्यास करून या विषयावर आम्ही निर्णय देऊ असे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.

-Ads-

सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांच्यावर सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी काही आरोप केले आहेत. त्या संबंधात सीव्हीसी म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला आहे. दक्षता आयोगाने केलेल्या शिफारशीवरूनच केंद्र सरकारने अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्यांच्याकडील कारभारही काढून घेतला आहे. त्याच्या विरोधात वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्या याचिकेवरील सुनावणी सध्या सुरू आहे.

आज झालेल्या सुनावणीच्यावेळी दक्षता आयोगाच्या अहवालाच्या प्रति ऍटर्नी जरनरल के के वेणुगोपाल यांनाही देण्यात आल्या. त्यावेळी विशेष संचालक अस्थाना यांच्या वकिलानेही त्यांच्यावतीने या अहवालाची प्रत मागीतली. पण त्यांना ती प्रत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणात कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, अंदामानात बदली करण्यात आलेले सीबीआयचे अधिकारी ए. के. बस्सी यांच्याही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत त्याची एकत्रित सुनावणी या खंडपीठापुढे सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)