वृद्धीमान सहाने झळकावले झंजावती शतक

नवी दिल्ली: भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सूक असणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने सय्यद मुश्‍ताक अली न्टी-20 स्पर्धेत बंगालकडून खेळाताना झंजावती शतक झळकावताना अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या बंगालला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर सहाने फतकेबाजी करताना 62 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 129 धावांची भन्नाट खेळी साकारली. यावेळी साहाचा स्ट्राइक रेट होता 208.06. साहाच्या या फलंदाजीच्या जोरावर बंगालला अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 234 असा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशला 20 षटकांमध्ये 4 बाद 127 धावा करता आल्या आणि बंगालने 107 धावांनी मोठा विजय साकारला. यावेळी सहा व्यतिरीक्त विवेक सिंगने 18 चेंडूंमध्ये 49 धावांची धमाकेदार खेळी साकारली. तर, बंगालच्या गोलंदाजांनी चिवट मारा करत अरुणाचल प्रदेशला धावा करु दिल्या नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)