गुजरात: गुजरातच्या जुनागड मधील गिरच्या जंगलात एकमेव मतदारासाठी बूथ लावण्याचं ठरवलं आहे. प्रशासनाने ज्या एकमेव मतदारासाठी मतदान केंद्र सुरू केलं आहे, तो एका मंदिरातला पुजारी असून ‘गुरू भरतदास’ असं या व्यक्तीच नाव आहे.
या एकमेव मतदारासाठी 5 निवडणूक कर्मचाऱ्यांचं अख्खं पथक त्या केंद्रावर असणार आहे. या एका व्यक्तीच्या मतदानासाठी गुजरात वन विभागाद्वारे ही संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे.
गुरू भरतदास हे मूळचे राजस्थानातले असून, शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आध्यात्माचा मार्ग स्वीकारला. गेली 15 वर्षं ते गिरच्या जंगलात बाणेज गावातल्या एका पुरातन मंदिरातच वास्तव्याला आहेत. ते या गावातले एकमेव अधिकृत मतदार आहेत.