कलंदर: मतदार…

उत्तम पिंगळे

कालच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. त्यांनी जरा थंडपणे स्वागत केले.
मी : काय सर कसला विचार करता?
विसरभोळे: अतिशय चारित्र्यसंपन्न व्यक्‍तिमत्त्व हरपले. मी पर्रीकरांविषयी बोलत आहे. राजकारणात झुंडशाही गुन्हेगारी प्रवृत्ती फिरत असताना असे व्यक्‍तिमत्त्व असणे अतिशय दुर्मीळ झालेले आहे.
मी: खरी गोष्ट आहे. अनेक वृत्तपत्रे वाहिन्यांनी त्यांच्याविषयी अनेक आठवणी सांगितल्या. संरक्षणमंत्री व अनेक वेळा मुख्यमंत्रिपद स्वीकारलेली व्यक्ती हल्लीच्या राजकारणात निष्कलंक असणे मोठी दुर्मीळ गोष्ट आहे.
विसरभोळे: अहो, आज तर साध्या नगरसेवकाला आपण त्या विभागाचा सुभेदार वाटते. असे असताना केवळ राज्यातच नाही तर देशहिताचा सतत विचार करून कार्यरत राहणे तसेच निष्कलंक व अहंकारी नसणे हे मोठेच आहे.
मी: मग मतदारांनीच अशा व्यक्ती निवडून देणे महत्त्वाचे नाही का?
विसरभोळे : बरोबर आहे. पण अशा व्यक्ती आता दुर्लभ होत चालल्या आहेत. म्हणजे अशा निष्कलंक, चारित्र्यवान व प्रामाणिक व्यक्ती जगात नाहीत, तसे नाही. खरेतर त्यामुळेच जग चालले आहे. पण, राजकारणात अशा व्यक्ती खूप कमी आहेत.
मी: म्हणूनच मतदारांनी आता मोठा निर्णय घेऊन चांगली व्यक्ती निवडून दिली पाहिजे.
विसरभोळे: तसे होत नाही ना. म्हणून ‘नोटा’ म्हणजे या पैकी कुणीही नाही असा पर्यायही मतदान यंत्रात असतो. निवडणूक लढवणे साधे काम राहिले नाही. यासाठी प्रचंड पैसा लागतो. तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या, पूर्वीपेक्षा जसे नेते व राजकारणी बदलले तसे मतदारही बदलले आहेत.
मी: म्हणजे मी समजलो नाही.
विसरभोळे: पूर्वी गावोगावी प्रचारसभा असत. बॅनर्स पोस्टर, बिल्ले वाटणे असे प्रचाराचे स्वरूप असे. आता यातील बहुतेक जागा पैशाने घेतली आहे. सुशिक्षित मतदारदेखील अशा आमिषांना बळी पडतात. आपल्या सोसायटीला रंग लावावा, कंपाउंड वा पेव्हर ब्लॉक लावा, मग मत देऊ.
मी: म्हणजे पक्ष, नेता, कार्यकर्ता यांना काही महत्त्व आहे की नाही?
विसरभोळे: नाही, असे नाही, पण आजकाल सत्ता स्थापनेसाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकीट दिले जाते. अशी क्षमता जो जास्त पैसा खर्च करू शकतो त्यापाशीच असते, असे नाईलाजाने म्हणावे लागते. कित्येक पक्ष हाडाचे कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट देतात. शहरी मतदार अशा मागण्या करतात मग ग्रामीण वा वस्त्या वस्त्यांत विखुरलेल्या मतदारांचे काय? आशांना प्रचारात विविध प्रलोभने दिली जातात. प्रचाराचे स्वरूप जातीय क्षेत्रीय वा भाषिक असे केले जाते. देवादिकांच्या नावाखाली प्रचार केला जातो दमदाटी करणे, पैसा, दारू यांचे वाटप, कपडेलत्ते घरगुती सामान यांचे वाटप असेही सर्वत्र चालू असते. आता शिक्षणाने थोडासा बदल होत आहे पण आजही त्यांचा म्होरक्‍या सांगेल ती पूर्वदिशा असे मानले जाते. मग या पुढाऱ्याला आपल्या बाजूने घेण्यातचा सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. तुम्हाला ते गाणं माहीत आहे ना…
आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखंरं…
मतदारं…
आम्ही मतदार मतदार लोकशाहीचे आधार (2)
या प्रचार गर्दीत मांडून ईवले मत ।। ध्रु ।।
आम्ही मतदार मतदार लोकशाहीचे आधार (2)
या पिकल्या बुथावर, तुझ्या मतदानाचा थर
या डोंगर वस्तीवर खाण्या पिण्याची झालर
त्याच्या अंगात अंगात …(2)
नांदतोया निकाल ।। 1 ।।
आल्या बरसाती घेउन देशीविदेशीची धून
या झिंगल्या लोकांना बांधले शपथेनं
निशाण्या गोंदून …(2)
धरली या कॉलर ।। 2 ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)