मतदान करा; पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन 

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरात चालू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला असून विशेष म्हणजे सर्व विरोधी पक्षांना, व्यापार, मनोरंजन, खेळ जगतातील मान्यवरांना टॅग केले आहे. या ब्लॉगद्वारे नरेंद्र मोदींनी मतदारांना जागरूक होत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदींनी म्हंटले कि, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महिन्याभरापेक्षाही कमी काळ राहिला आहे. मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. मतदान करत आपण देशाची स्वप्नं आणि अपेक्षा पूर्ण करण्यात आपलं योगदान देण्याचं काम करतो. आपण सर्वांनी एक असं वातावरण तयार करुयात जिथे मतदानपत्र मिळणं आणि मतदान करणं गर्वाची गोष्ट मानली जावी. निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आणि मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव बनला पाहिजे, असे त्यांनी लिहिले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1105683761834921986

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)