जास्तीत जास्त संख्येने मतदान करा : अखिलेश यादव

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरात चालू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला असून विशेष म्हणजे सर्व विरोधी पक्षांना, व्यापार, मनोरंजन, खेळ जगतातील मान्यवरांना ट्विटद्वारे टॅग केले आहे. या ब्लॉगद्वारे नरेंद्र मोदींनी मतदारांना जागरूक होत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  मोदींच्या या ट्विटवर ससमाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे कि, पंतप्रधानांनी #महापरिवर्तण ते #महागाठबंधनचे आवाहन केले आहे हे अत्यंत उत्साहवर्धक आहे. मी सर्व भारतीयांना विनंती करतो कि,
जास्तीत जास्त संख्येने मतदान करणे हे लोकशाहीसाठी शुभ संकेत आहे. त्यामुळे मतदान करा. विरोधी पक्षांना, व्यापार, मनोरंजन, खेळ जगतातील मान्यवरांना जास्तीत जास्त संख्येत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)