रिक्‍त जागा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत असून, ते पूर्ण होत आहेत. या सर्व प्रवेश फेरीनंतर संस्थांमध्ये रिक्‍त राहिलेल्या जागांची संख्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे, असे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व संस्थांना बजावले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अॅॅण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी हे अभ्यासक्रम होय. या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश अंतिम टप्प्यात येत असून, त्यांच्या नियमित तीन प्रवेश फेरी पूर्ण होत आहे. त्यानंतर या अभ्यासक्रमाच्या रिक्‍त राहिलेल्या जागा संस्थांना त्यांच्या स्तरावर भरण्यास परवानगी दिली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, संस्थास्तरावर किती जागा रिक्‍त आहे, त्याची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या ठिकाणी जाऊन किती जागा आहेत, त्याची माहिती घेऊन प्रवेशाचा निर्णय पालकांना घ्यावा लागतो. त्यात पालकांची मोठी दमछाक होते. अशा पार्श्‍वभूमीवर राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व संस्थांना त्यांच्या रिक्‍त राहिलेल्या जागा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. संस्थास्तरीय कोट्यातील जागा, अल्पसंख्याक कोट्यातील जागा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्‍त राहिलेल्या जागा प्रसिद्ध करावे लागतील, असेही वाघ यांनी म्हटले आहे. संस्थास्तरावर प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जावरून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावे लागेल. त्याप्रमाणे प्रवेश देणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)