#विविधा – पितृपक्ष (भाग 2)

-अश्विनी महामुनी

विविधा पितृपक्ष (भाग 1)

गणपती  विसर्जन झाल्यानंतर दोन दिवसातच पितृपक्ष सुरू झाले आहेत. भाद्रपद महिनातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हट्‌ले जाते. पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना जेवू घालण्याचा काळ. हे पंधरा दिवस घरोघरी पितरांचे श्राद्ध घातले जाते.

-Ads-

बाकी जिवंतपणी आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारांनी नंतर डामडौलात श्राद्ध वगैरे करण्यावर साधुसंतांनीही चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

बाकी अनेकदा या कर्मकांडाचा अति बडिवार केला जातो, भोळ्याभाबड्या जिवांची फसवणूक केली जाते. पाप-पुण्याचे भय दाखवले जाते. याबाबतीत मला काहीतरी पाचवी-सहावीतला हिंदीच्या पुस्तकातील एक धडा आठवतो, तेनालीरामनची गोष्ट होती ती.

श्राद्धानिमित्त मृत व्यक्‍तीला आवडणाऱ्या वस्तूंचे दान करावे. नाही तर त्यांना मुक्‍ती मिळणार नाही, तुम्हाला पाप लागेल अशी भीती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या पुरोहितांना तेनालीरामन एकदा आपल्या घरी बोलवतो आणि बोलावताना सांगतो, की माझ्या आजोबांची एक मोठी इच्छा अपुरी राहिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. तरी सर्वांनी आवर्जून यावे. मी सारी जय्यत तयारी करून ठेवली आहे.

सारे टोळके मोठ्या आशेने तेनालीरामनच्या घरी जाते. ते घरी आल्यावर तेनालीरामन घराचे दार बंद करून घेतो. आणि आपल्या नोकरांच्या मदतीने जमलेल्या सर्वांना चांगल्या लालबुंद तापलेल्या सळ्यांनी पार्श्‍वभागावर डाग देतो.

सर्वजण रडत ओरडत राजाकडे तक्रार घेऊन जातात. राजा तेनालीरामनला बोलावून घेतो आणि जाब विचारतो.

माझ्या आजोबांना बरे होण्यासाठी पार्श्‍वभागावर डाग देण्यास वैद्यांनी सांगितले होते. पण तो उपचार करण्यापूर्वीच ते मरण पावले. ती इच्छा त्यांची अपुरी राहिली म्हणून अशा प्रकारे पूर्ण केली. जर यांना दिलेले दान, खाणेपिणे, दागदागिने वा कपडेलत्ते पूर्वजांना पोहोचत असतील, तर यांना दिलेले डागही माझ्या आजोबांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांच्यसाठीच तर मी हे केले आत माझे काय चुकले?

तेनालीरामनच्या या प्रश्‍नाला कोणाकडेच उत्तर नव्हते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)