#विविधा – पितृपक्ष (भाग 1)

-अश्विनी महामुनी

गणपती  विसर्जन झाल्यानंतर दोन दिवसातच पितृपक्ष सुरू झाले आहेत. भाद्रपद महिनातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हट्‌ले जाते. पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना जेवू घालण्याचा काळ. हे पंधरा दिवस घरोघरी पितरांचे श्राद्ध घातले जाते.

आपल्या नातेवाईकांचा विशेषकरून माता-पिता, आजी-आजोबा, काका-काकी आदी जवळचे नातेवाईक ज्या तिथीस मरण पावले असतील त्यातिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. स्मरण केले जाते. त्याच्या नावाने दानधर्म केला जातो. हे सारे आपल्या समाधानासाठी. या दिवसात आपल्य दिवंगत नातेवाईकांचा आत्मा आपल्या घरी येतो अशी समजूत आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा आहे. म्हणा. त्यातील सीमारेषा म्हणा किंवा लक्ष्मणरेषा म्हणा फार फार अंधुक असते. जी एकाला श्रद्धा वाटते, ती इतरांना वाटेलच असे नाही. पण त्यामागचा भाव महत्त्वाचा आहे.

-Ads-

पण पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच त्याची चाहूल लागते ती सोशल मीडियावर. पितृपक्षासंबंधी गमतीदार पोस्टस आणि विनोदांचा नुसता पाऊस पडतो सोशल मीडियावर. आता माझी पाळी आली-अब मेरी बारी … अशी कॉंमेंट अगदी टर्रेबाज कावळ्याच्या चित्राखाली टाकलेली व्हायरल होते आहे, तीन-चार वर्षे.

पितृपक्ष, श्राद्ध, पिंड ह्या सर्व भावनेच्या-श्रद्धेच्या गोष्टी आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा किंवा लक्ष्मणरेषा म्हणू आपण हवे तर. फार अस्पष्ट असते. श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते कळत नाही किंवा एखाद्याची श्रद्धा ही दुसऱ्याला अंधश्रद्धा का वाटते हेदेखील कळत नाही. शेवटी या सर्व गोष्टी आपण करतो त्या आपल्या मानसिक समाधानासाठी.

माझे आजोबा नवमीला गेले होते, रामदास नवमीला. तेव्हा पितृपक्षात आमच्याकडे नवमीला श्राद्ध असते. कोकणात त्याला म्हाळ म्हणतात. त्या दिवशी गेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ करतात. काही ठरावीक भाज्या आणि खिरीसारखे पदार्थ त्या दिवशी अगदी मस्ट असतात. नवमीला आमचा घरी आमचे जवळचे नातेवाईक अगदी आवर्जून येतात.

माझ्या आजोबांचा फोटो टेबलावर ठेवून त्याला हार घालतात, पूजा करतात, नैवेद्य दाखवतात. एक नैवेद्य कावळ्याला, तर एक गाईला दिला जातो. सर्वजण अगदी जिव्हाळ्याने एकत्र आलेले असतात. त्या दिवशी. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. माझे वडील, काका, आत्या त्यांच्या लहानपणाच्या त्यांच्या वडिलांच्या, म्हणजे माझ्या आजोबंच्या आठवणी काढतात. मलाही आजोबा चांगले आठ्‌वतात. अतिशय प्रेमळ आणि आनंदी होते ते.

माझे आणि माझ्या भावाचे त्यांनी केलेले लाड मला अजूनही आठवतात. वाटते, खरंच ते दिवस फारच सुखासमाधानाचे होते. बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात ते आमच्या बाबतीत अगदी 100 टक्के खरे आहे. बाकी काहीही धार्मिक कारणे असली, तरी जिव्हाळ्याची मंडळी एकत्र येण्याचे हे एक उत्तम निमित्त आहे यात काही शंका नसावी.

विविधा पितृपक्ष (भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)