ज्वलंत, वास्तवदर्शी, नोबेल विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे निधन 

नोबेल आणि बुकर पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांचे लंडन येथील त्यांच्या राहत्याघरी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून या बाबतचा खुलासा करण्यात आला आहे. ८५ वर्षीय या लेखकाचा मृत्यू कसा झाला याबाबतचा खुलासा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेला नाही. ‘सर विडीया’ या नावाने देखील ते ओळखले जायचे.
आपल्या विशीच्या काळात लिहलेल्या ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास’ या कादंबरीतून ते प्रथम चर्चेत आले. १९९०मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांनी त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानीत केले होते.
व्ही.एस.नायपॉल यांचे खाजगी आयुष्य खूप वादग्रस्त राहिले. लग्नानंतर देखील वैश्यांसोबत संबंध ठेवणे, घरकाम करणाऱ्या महिलेचे शारीरिक शोषण करणे आणि आपल्या पत्नीचे शोषण करणे अश्या अनेक कारणांनी ते खूप चर्चेत राहिले. यांचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या पॅट्रीक फ्रेंच यांना असे देखील सांगितले होते की, “मी तिला (पत्नीला) जवळजवळ मारलेच होते.”
व्ही.एस.नायपॉल यांची पुस्तके ज्यामध्ये वास्तववादी कादंबरी ‘अ हाऊस फॉर मी. बिस्वास(१९६१), अ बेन्ड इन रिव्हर (१९७९), आणि बुकर पुरस्कार विजेती कादंबरी ‘इन अ फ्री स्टेट(१९७१)’ हे  आजही उत्तम कलाकृती म्हणून संबोधली जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)