मोदींच्या लूकमुळे विवेक ऑबेरॉय ट्रोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फर्स्ट लूकचे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल 2 वर्षानंतर विवेक बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप उघड करण्यात आली नाही. मात्र फर्स्ट लूकवरून अभिनेता विवेक ट्रोल होत आहे.

सोशल मीडियावर विवेकला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील एका गटाला नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी विवेकची निवड बिलकूल आवडली नाही. त्यामुळे ते विवेकला ट्रोल करत आहेत. या चित्रपटासाठी विवेकला घेतल्यामुळे अनेक जण चित्रपटाच्या टीमविरुद्ध वक्तव्य करत आहेत.

या भूमिकेसाठी परेश रावल असायला हवे होते, असंही ट्रोलर्सचे म्हणणे आहे. तसेच पोस्टरवर विवेकचा लूक नकली आणि फोटोशॉपने तयार केलेला वाटत आहे. स्वतः विवेक ओबेरॉयनेमात्र या भूमिकेबाबत समाधान व्यक्‍त केले आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची भूमिका आपल्याला मिळाली असल्याचे त्याने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)