आणखी 19 विमानांची ‘विस्तारा’ करणार खरेदी  

नवी दिल्ली: विस्तारा एअरलाईन्सकडून 19 प्रवाशी विमाने खरेदी करण्यात येणार असून त्याकरिता 3.1 अब्ज डॉलर खर्च करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 
कंपनीकडून आंतराराष्ट्रीय पातळीवरील आपली विमानसेवा ग्राहकांना देण्याकरिता विस्तारा फ्लीटमध्ये ए320 नियो 21 विमाने आणि इतर 50 विमानाचा यात समावेश करण्यात येणार आहे. 
एअरबस ए320 नियो 13 विमाने आणि बोईग सहा 787 -9 ड्रीमलायनर अशी मॉडेल असणारी विमानांची खरेदी कंपनीकडून करण्यात येणार आहे. तर विमानाकरिता सीएफएम आंतरराष्ट्रीय पातळीवरील से लीप 1- ए इंजिन खरेदी 2019 आणि 2023 या कालावधीत करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे. 
आपली सेवा देशभरातील सर्व भागात विस्तारीत करण्यातकरिता व ग्राहकांमध्ये आपला विश्‍वास निर्माण करण्याकरिता व आंतरराष्ट्रीय सेवा चालू करण्यात ताकद निर्माण करण्यासाठी कंपनी नवीन योजनासह आपल्या धोरणामध्ये बदल करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांग्ण्यात आले. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)