‘अमोल कोल्हे -राज ठाकरे’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

मुंबई – राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. पण भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)