टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद

कोलकत्ता – भारताच्या ‘विश्वनाथन आनंद’ने टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेतील ब्लिट्समधील विजेतेपद पटाकाविले आहे. विश्वनाथनने बुधवारी प्ले-आॅफमध्ये अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत करत ब्लिट्स स्पर्धा जिंकली.

विश्वनाथन आनंद मंगळवारी चौथ्या स्थानावर होता. मात्र अंतिम दिवशी त्याने नऊ फेऱ्यांमध्ये सहा विजय मिलविले आणि तीन डाव बरोबरीत सोडविले आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या नाकामुराशी बरोबरी साधली. त्यानंतर विजेता निश्चित करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन फेऱ्यांच्या प्ले-आॅफमध्ये आनंदने 1.5-0.5 अशी बाजी मारत विजय संपादित केला.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)