विश्‍व हिंदु परिषदेची धर्मसभा आज; अयोध्येला किल्ल्याचे स्वरूप 

तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात  

अयोध्या: विश्‍व हिंदु परिषदेने उद्या अयोध्येत धर्मसभा आयोजित केली आहे. त्यावेळी तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून अयोध्येला सध्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की एक अतिरीक्त पोलिस महासंचालक, एक उपमहानिरीक्षक, तीन वरीष्ठ पोलिस सुपरिंटेंडेंट, दहा अतिरीक्त पोलिस अधिक्षक, 21 उप अधिक्षक, 160 निरीक्षक, 700 कॉन्टेबल्स, पीएससीच्या 42 कंपन्या, दंगल विरोधी पथक, दहशतवाद विरोधी पथक अशी एकूण पाच पथके, आणि ड्रोन्स निरीक्षण अशी सुरक्षा व्यवस्था तेथे तैनात करण्यात आली आहे.

अयोध्येचे महापौर ऋषीकेश उपाध्याय यांनी पीटीआयला सांगितले की तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मसंसदेसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे पण शिवसेनेच्या कार्यक्रमाला मात्र अजून पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. भाजपच्या काही नेत्यांनी अयोध्येत उद्या मंदिर उभारणीचा पायाभरणी कार्यक्रम करण्याची घोषणा केली आहे. पण तो विश्‍व हिंदु परिषदेचा अधिकृत कार्यक्रम आहे की नाही या विषयी कोणतीच स्पष्टता अजून झालेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठीही शेकडो शिवसैनिक अयोध्येत जमले आहेत.

विश्‍व हिंदु परिषदेच्या अवध प्रांताचे संघटक भोलेंद्र यांनी एक लेखी निवेदन या बाबतीत प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, अयोध्येत होणारी विश्‍व हिंदु परिषदेची ही शेवटची धर्मसंसद असेल त्यानंतर येथे थेट राम मंदिर उभारणीचे काम सुरू होईल त्यामुळे येथे यापुढे कोणतीही धर्मसंसद होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)