विराटच्या विक्रमावर ‘वीरेंद्र सेहवाग’ने दिली अनोख्या अंदाजात प्रतिक्रिया

भारतीय संघाचा कर्णधार ‘विराट कोहली’ याने बुधवारी वेस्टइंंडिजविरूध्दच्या सामन्यात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी डावांत 10,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून विराटची नोंद झाली आहे. विराटने सचिन तेंडुलकरचा 17 वर्ष जुना जागतिक विक्रम मोडला आहे.

विराटच्या या विक्रमानंतर क्रिकेट जगतातील मोठ्या खेळाडूंनी विराटचे अभिनंदन करत पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमीच आपल्या हटके स्टाईलने सोशल मिडीयावर पोस्ट करणारा भारतीय माजी क्रिकेटर ‘वीरेंद्र सेहवाग’ याने विराटाला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेहवागने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘तुमचा फोन तुम्हाला नवीन साॅफ्टवेअरबदल जितक्या वेळात अपडेट देताे, त्यापेक्षा जास्त वेगाने विराट कोहली त्याच्या विक्रमाबदल अपडेट देत असतो’. सेहवागने खेळातील कसिस्टेंसीचे (सातत्य) महत्व सांगितले आहे. विराटने 11 डावाच्या अाधीच 9,000 धावा पूर्ण केल्या होत्या आणि आता 10,000 धावा.

सचिन तेंडुलकरने सुध्दा विराट कोहलीला शुभेच्छा देत पुढेही अशाच धावा काढत रहा असे म्हटले आहे. तसेच विराटच्या धावा काढण्याची तीव्रता आणि सातत्य हे आश्चर्यकारक असल्याचे सचिनने म्हटलं आहे.

तर दुसरीकडे सुरेश रैनाने देखील शायरी लिहित विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/ImRaina/status/1055063677517393920

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)