वनडे वा टेस्ट विराटच बेस्ट !!!

भारताचा कर्णधार विराट कोहली याला यंदाचा इंग्लंड दौरा भलताच पावला आहे. मागील दौऱ्यात कसोटी सामन्यात चांगली कामगिरी न करू शकणारा विराट पहिल्याच कसोटीमध्ये खोऱ्याने धावा वसूल करताना दिसला. त्याने दोन्ही डावात मिळून २०० धावा केल्या.

पहिल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात विराट आणि भारतीय संघाला अपयश  आले. तरीदेखील या सामन्यातील उत्तम कामगिरीचा उत्तम मोबदला विराटला मिळाला आहे. तो कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

या कसोटी सामन्याअगोदर विराट कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत  दुसऱ्या स्थानावर होता आता तो ९३४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत देखील विराटचाच बोलबाला असून तो तिथेही ९११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)