विराट कोहलीची विराट खेळी असफल ; इंग्लड 31 धावांनी विजयी !

बर्मिंघम: कर्णधार विराट कोहलीची विराट पारी असफल ठरली. इंग्लडने भारताला ३१ धावांनी नमवून कसोटी मालिकेत १-० वर्चस्व मिळवले. विजयाचा पाठलाग करतांना भारतीय संघ १६२ धावांवर गारद झाला. इंग्लंडचा हा १०००वा कसोटी सामना होता.

ईशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्‍विन यांच्या भेदक माऱ्यासमोर बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावांत १३ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतासमोर दुसऱ्या डावांत विजयासाठी फक्त १९४ धावांचे आव्हान होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१९४ धावांचा पाठलाग करतांना बलाढ्य फलंदाजांचा भरणा असलेला भारतीय संघ एकामागे-एक विकेट गमावत गेला. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताचा धावफलक ११०/५ होता. त्यानंतर भारताला विजयासाठी ८४ धावांची गरज होती.

इंग्लडच्या बेन स्टोक्सने भारताचे ४ फलंदाज बाद केले. जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तसेच सॅम कुरेन आणि आदिल रशीद यांना १-१ विकेट मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)