विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

नॉटिंगहॅम: टी-20 मालिकेत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर आज सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा इंग्लंडचे जबरदस्त आव्हान आहे. दरम्यान, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने टी-20 मालिकेत इंग्लंडला 2-1 असे नमविले असले, तरी एकदिवसीय विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर असलेला इंग्लंडचा संघ सध्याचा सर्वोत्तम वन डे संघ समजला जातो. जोस बटलर, जेसन रॉय, अलेक्‍स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इयान मॉर्गन यांच्या फळीत बेन स्टोक्‍सचे नाव जोडल्यास भारतीय गोलंदाजांसमोर किती खडतर आव्हान आहे याची कल्पना येते.

एकदिवसीय विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा पुढच्या वर्षी अगदी याच कालावधीत इंग्लंडमध्ये रंगणार आहे. त्यामुळे विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना इंग्लंडमधील त्या काळातील हवामान आणि खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्याची ही नामी संधी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)