विराट कोहली अग्रस्थानी कायम !

आयसीसी कसोटी क्रिकेट रॅंकिंग

दुबई: आयसीसीने नुकत्याच जाहिर केलेल्या कसोटी क्रिकेट रॅंकिंग मध्ये विराट कोहलीने आपले अव्वल स्थान कायम राखले असून न्यूझीलंडचा कर्णधार केव विल्यम्सन दुसऱ्या स्थानी आहे. तर, भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजारा तिसऱ्या स्थानी कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कसोटी क्रमवारीत विराट कोहलीहा 992 गुणांसह पहिल्या स्थानी असून त्याच्या नंतर असलेल्या केव विल्यम्सनचे 897 गुण आहेत तर तिसऱ्या स्थानी असणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराकडे 881 गुण आहेत. त्याच बरोबर दक्षिण अफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेर पर्यंत किल्ला लढवत श्रीलंकेला विजय मिळवून देणाऱ्या कुसल परेराने तब्बल 58 स्थानांनी झेप घेतली असून तो सध्या 40व्या स्थानी पोहोचला आहे.

तर, गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दक्षिण अफ्रिकेच्या कगिसो रबाडाला मागे टाकत पहिले स्थान पटकावले असून. कमिन्सहा 2006 साल नंतर क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा पहिला गोलंदाज असून या पुर्वी त्यांच्या ग्लेन मॅक्‍सग्राने या क्रमवारीत 2006 साली प्रथम स्थान मिळवले होते. यावेळी इंग्लंडचा जेम्स अँडरसन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

तर, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्‍विन हा पाचव्या स्थानी असून रविंद्र जडेजा हा तिसऱ्या स्थानी आहे. तर, या क्रमवारीत प्रथम स्थानी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरहा प्रथम तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)