#AUSvIND : हे माझे सर्वात मोठे यश – विराट कोहली

सिडनी : ऑस्ट्रेलियातच माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला मी सुरुवात केली होती आणि आज चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातच या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे या संघाचा एक सदस्य असल्याचा मला आनंद आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवू शकलो हे कर्णधार म्हणून माझे सर्वात मोठे यश आहे. असे मत विराटने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पुढे बोलताना तो म्हणाला की, मला याआगोदर माझ्या संघाचा इतका अभिमान कधीच वाटला नव्हता. आमची सुरुवात अतिशय योग्य झाली. तुमच्या संघात असे तरुण आणि उत्साही साथीदार असतील तर कर्णधार म्हणून तुम्हालाही मजा येते. संघातील खेळाडू कर्णधाराची कामगिरी उंचावत असतात. संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली हे मी माझं नशीब समजतो. आतापर्यंत माझ्या आयुष्यातले हे सर्वात मोठे यश आहे. या मालिका विजयामुळे आमच्या संघाला आता एक वेगळी ओळख मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच, भारतीय गोलंदाजांसाठी ही मालिका अतिशय चांगली गेली. प्रत्येक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. फलंदाजीत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. त्यामुळे आम्ही दोन्ही फळ्यांवर सरस कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवले असेही तो यावेळी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)