सुरुवात मी करणार नाही परंतु कोणी मला छेडले तर …. – विराट कोहली

ब्रिस्बेन – भारतीय संघ कधीच प्रथम बाचाबाचीची सुरुवात करत नाही. पण जर कोणी त्याला डिवचले तर स्वतःच्या आत्मसन्मानसाठी मी त्यांना प्रतिउत्तर देणार, असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी सांगितले . ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या टी – 20 सामन्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतत्याने एका प्रश्नाच्या उत्तरात असे नमूद केले.

भारत आणि ऑस्ट्रेरलिया दौऱ्याची सुरुवात 21 नव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टी- 20 सामन्याने होनार आहे. त्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विराट पुढे म्हणाला, मैदानावर कसा खेळ चालू आहे यावर माझी आक्रमकता अवलंबून आहे. समोरील संघ जर आक्रमक होत असेल तर मी ही त्याचप्रकारे प्रतिआक्रमण करून उत्तर देणे हे साहजिक आहे.

-Ads-

माझ्यासाठी आक्रमकता ही विजयाच्या भुकेतून येते. मला माझ्या संघासाठी 120 टक्के द्यायचे असते. त्यात मी कमी पडता कामा नये. एक संघ म्हणून तुम्हाला विकेट घेण्यासाठी एकत्रीत काम करावे लागते. गोलंदाज एकाच ठिकाणी वारंवार चेंडू टाकून विरोधी फलंदाजाला घेरण्याचा प्रयन्त करतो तर त्याला संपूर्ण संघ साथ देत असतो. फलंदाज काहीही न बोलता आपल्या फटकेबाजीच्या जोरावर आक्रमकता दाखव शकतो. असेही त्याने यावेळी नमूद केले.

स्मिथ आणि वॉर्नर यांच्याबद्दल विचारले असता विराट म्हणाला, सर्वांना माहिती आहे की त्या कसोटीमध्ये काय झाले. परंतु, त्यांच्यावरील बंदी कितपत योग्य आणि अयोग्य यावर नेमकेपणाने त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे त्यावर मी काही बोलू शकत नाही. त्यांचेदोन महत्तवाचे खेळाडू या या मालिकेसाठी नाहीत तरी देखील त्यांच्याकड़े सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. त्यामुकले आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
50 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)