…तर मला घरी बसावे लागले असते – विराट कोहली

चेन्नई -विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामधील वाद काही नवीन नाही. दोघे एकमेकांना संधी मिळेल तेव्हा टोमणे मारत असतात. त्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर आयपीएलचे एकही विजेतेपद नाही.

यावरून गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी, विराट कोहलीला टोमणा मारला होता. त्याचे कर्णधारपद कायम ठेवल्याबद्दल त्याने आरसीबीचे आभार मानायला हवेत, असे वक्तव्य केले होते. याला विराटनेही सडेतोड उत्तर देताना जर बाहेरच्या लोकांनी केलेल्या टीकेचा विचार करत बसलो तर आतापर्यंत घरी बसलो असतो, असे म्हटले आहे.

गौतम गंभीरचे नाव न घेता विराट म्हणला, मी आयपीएल जिंकू शकलो नाही याबद्दल बाहेर लोक चर्चा करतात, बोलत असतात याची मला कल्पना आहे. त्यांना काहीतरी बोलण्याची संधीच हवी असते. मात्र, माझ्यावर कर्णधार म्हणून जबाबदारी आहे. माझ्या संघाला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून द्यायला मला नक्की आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)