ऋषभचा बळी निर्णायक ठरला : विराट कोहली

ब्रिस्बेन – भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आपला पहिला सामना 4 धावांनी गमावला त्यामुळे भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिके 1-0 अश्‍या पिछाडीवर पडला आहे. पहिल्या सामन्यात विजयाच्या इतक्‍या जवळ येऊन पराभव पतकरावा लागल्यानंतर पराभवाची कारणमिमांसा करताना संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मोक्‍याच्या क्षणी खराब फटका खेळून बाद झाला आणि नेमका त्याचा बळीच सामन्याचा निर्णायक क्षण ठरला.

पहिल्या सामन्यात पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताला 174 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर शिखर धवनने 42 चेंडूंमध्ये 76 धावा करत, चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी 3.5 षटकांमध्ये 51 धावा जोडल्या आणि त्या वेळी पारडे भारताच्या बाजूने होते. मात्र, वेगवान गोलंदाज अँड्रयु टायने ऋषभ पंतचा बळी घेतला आणि सामन्याचे चित्रच पालटले.

-Ads-

आम्ही सुरुवात चांगली केली होती, मात्र मधल्या षटकांमध्ये थोडास गोंधळ उडाला त्याच्यामुळे पराभव झाला असेही कोहलीने यावेळी कबूल केले. शिखर धवनला पुन्हा सूर गवसला असल्याकडे लक्ष वेधत, असल्याचे सांगत कोहली म्हणाला, “सलामीच्या दृष्टीने धवन हा खूप चांगला खेळाडू आहे. त्याचे टी-20मध्ये आतापर्यंत एकही शतक नसले, तरी त्याच्या खेळी संघासाठी नेहमीच फायदेशीरच ठरलेल्या आहेत.

या सामन्यातून आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून भरपूर शिकलो असून, दुसऱ्त्या सामन्यात सुधारणा करू. एकाच दिवशी संघातील तीन ते चार जण उभे राहिले, तर तेच आम्हाला हवे आहे. मात्र, कोणती गोष्ट चांगली होईल आणि कोणती वाईट, याविषयी विचार करण्यासाठी फारसा वेळच नाही. मात्र, मालिकेतील आगामी सामने चुरशीचे होतील असेही कोहलीने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)