खेलरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने लिहिली ‘भावनिक पोस्ट’

नवी दिल्ली – क्रिकेटपासून दूर विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ आशियाचषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. दोनच दिवसापूर्वी विराट कोहलीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळ्याची त्याची पत्नी अनुष्कासुध्दा उपस्थित होती.

विराटने खेलरत्न पुरस्कार घेतल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या पत्नीचे कौतुक केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर अनुष्काचा फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट वाचून तुम्ही सुध्दा भावुक व्हाल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विराट कोहलीने लिहिले आहे की, ‘ती व्यक्ती अनेक अडथळे, अडचणी असतानादेखील मला पुढे जाण्यास प्रोत्साहित करते, ती व्यक्ती जी मला जीवनात सर्व कठिण प्रसंगात योग्य निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते. ती व्यक्ती जिने मला आतून बदलविले आणि मला खऱ्य़ा प्रेमाच्या ताकदीची जाणीव करून दिली’. ती व्यक्ती म्हणजे माझी शक्ती म्हणजेच माझी जीवनसाथी होय.

विराटच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जास्तकरून चाहत्यांनी त्याचे कौतूक केले आहे तर काहींनी टोमणेसुध्दा मारले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)