विराट सध्याच्या घडीचा सर्वोत्तम फलंदाज – गिलख्रिस्ट

सिडनी – भारत -ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने विराट कोहलची स्तुती करताना म्हटले की, सध्या विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळे भारतीय संघ त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा करत आहेत. परंतु, येथील परिस्थितीचा आणि दोन्ही संघातील गोलंदाजांचा विचार केला तर सर्व फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे.

भारतीय संघाने कसोटी इतिहासात एकदाही ऑस्ट्रेलिया धर्तीवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विजय संपादन केलेला नाही. ऑस्ट्रेलियाची मजबुती हे त्यांचे जलदगती गोलंदाज आहेत. परंतु, त्यांच्यसमोर विराट कोहलीला लवकर बाद करणे हेच मोठे अव्हान असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)