#CWC19 : पाकिस्तानी चाहत्यांकडून विराट कोहलीचे कौतुक

मॅंचेस्टर – भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला असून या पराभवामुळे पाकिस्तानचे चाहते संघावर टिका करत असतानाच सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या एका कृतीची सर्व पाकिस्तानी फॅन्स स्तुती करताना दिसून येत आहेत.

विराटने पाकिस्तानविरूद्ध खेळ भावनेचा परिचय करून दिला आहे. त्याने मैदानात मॅच सुरू असताना पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज वहाब रियाज याला अशी वागणूक दिली. त्यामुळे सोशल मीडियावर विराट कोहलीचे कौतुक केले जात आहे. विराट कोहली हा रोहित शर्मासोबत फलंदाजी करत असताना गोलंदाजी करताना वहाब रियाझ घसरून पडला. विराटने पुढे जाऊन त्याची विचारपूस केली आणि वहाब उठून उभा रहावा म्हणून विराटने मदतीसाठी आपला हात पुढे केला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंना एकमेकांकडे पाहून स्मित हास्य दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)