विराटच्या नावावर आणखी एक विक्रम

राजकोट – येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 181 धावात संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात केलेल्या 649 धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली.

भारताने विंडीजला फॉलोऑन दिला. याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एक आणखी विक्रम नोंदवला. त्याने पाचव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देत माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महेंद्रिसिंग धोनी यांना पिछाडीवर टाकले. गांगुली आणि धोनी यांनी आपल्या कर्णधारपदाच्या काळात प्रत्येकी 4-4 वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला होता. विराटने आज त्यांना मागे टाकले. सुनील गावस्कर व राहुल द्रविड यांनीही प्रत्येकी 3-3 वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला आहे. या विक्रमात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( 7 फॉलोऑन) आघाडीवर आहे.

-Ads-

दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 196 धावात गुंडाळला आणि एक डाव 272 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)