भारत_वि_आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका : ‘या’ विक्रमासाठी विराटला हव्यात फक्त 8 धावा

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट रसिकांना ही मालिका सुरू होण्याची उत्सुकता आहे. तसेच भारतीय संघ आॅस्ट्रेलियाला या मालिकेत पराभूत करून इतिहास रच्चू शकेल का ? यावरही सर्व क्रिकेट रसिकांची नजर आहे.  भारतीय संघ इतिहास रच्चू शकेल कि नाही हे चौथ्या कसोटीनंतर स्पष्ट होईल, मात्र पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली 8 धावा करताच एक विक्रम त्याच्या नावे होईल. याआधी फक्त तीन भारतीय फलंदाजानीच हा विक्रम केला आहे.

दरम्यान, विराट कोहली हा आॅस्ट्रेलियात 1000 (एक हजार) धावा करण्यापासून केवळ 8 धावांनी मागे आहे. अाॅस्ट्रेलियात त्याच्या नावे 992 धावांची नोंद आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीवीएस लक्ष्मण हे असे फलंदाज आहे की, त्यांनी अाॅस्ट्रेलियात  1000 धावांचा आकडा पार केला आहे.

-Ads-

सचिन तेंडुलकरच्या नावे आॅस्ट्रेलियात 1809 धावांची नोंद आहे. तर लक्ष्मण याच्या नावे 1123 धावांची आणि राहुल द्रविड याच्या नावे 1143 धावांची नाेंद आहे.

तसेच कोहलीच्या नावे आॅस्ट्रेलियात 5 शतकाची नोंद आहे. तर सचिनच्या नावे 6 शतकाची नोंद आहे. जर विराट कोहली या मालिकेत दोन शतके करू शकला तर सचिनचा हाही विक्रम तो आपल्या नावे करू शकेल. विराटची मागील काही सामन्यातील कामगिरी पाहता तो हा विक्रम सहज मोडेल अशी आशा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)