#ICCWorldCup2019 : विजयाची परंपरा राखणार – कोहली

मॅंचेस्टर : आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विश्वचषकामध्ये एकमेकांना भिडणार असल्याने क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सामन्याआधी विराट कोहलीने माध्यमाशी संवाद साधला. विश्वचषकाच्या इतिहासामध्ये पाकिस्तानसोबत आजतागायत एकही सामना गमावला नसल्याने टीम इंडियाचा ‘जोश’ हाय आहे. ही विजयाची परंपरा कायम राखणार असा विश्वास कोहलीने व्यक्त केला.

पुढे कोहली म्हणाला, पाकिस्तानकडे भेदक गोलंदाज असले तरीही आमच्याकडे त्यांच्या षटकात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत.शिखर धवन याची अनुपस्थिती राहुल हा समर्थपणे भरून काढणार अशी मला खात्री आहे. ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळविल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here