विराट कोहलीने सातव्यांदा पटकाविला ‘मालिकावीरा’चा किताब

तिरूवअनंतपुरम : भारत विरूध्द वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर  9 गडी राखत पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. भारतीय संघाने मालिकेत 3-1 ने विजय मिळवला आहे. पण याबरोबरच भारतीय कर्णधार विराट कोहली याने सुध्दा मालिकावीराचा किताब पटकावला आहे.

या किताबासाठी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा याच्यांत मुकाबला होता, पण विराटने यामध्ये बाजी मारली. अखेरच्या सामन्यात फिरकीपटू रवींद्र जडेजा याने चार बळी घेत सामनावीराचा किताब पटकाविला.

विराट कोहली याने पाच सामन्यात तीन शतकं आणि 151 च्या सरासरीने 453 धावा केल्या आहेत तर रोहित शर्माने दोन शतकं आणि एक अर्धशतक केले आहे. रोहितने 129.66 सरासरीने 389 धावा केल्या आहेत.

विराट कोहली याने सातव्यांदा मालिकावीराचा किताब पटकाविला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीराचा किताब पटकाविण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावे आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे. त्यापाठोपाठ श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या (11 वेळा) आणि दक्षिण आफिक्रेचा शाॅन पोलक (9 वेळा ) यांचा क्रमांक लागतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)