विराट कोहली आणि टीमने डब्लिनमध्ये घेतला फिरण्याचा आनंद!

डब्लिन: आज (शुक्रवारी) भारत आणि आयर्लंड एकाच मैदानावर दुसऱ्यांदा खेळणार असून भारतीय संघ विजयी घौडदौड कायम ठेवण्याचे ध्येय ठेऊन मैदानात उतरेल.

दरम्यान, विराट कोहली यांच्यासोबत शिखर धवन, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी डब्लिनच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला. कोहलीने ट्विटरवर आपल्या टीमसोबत फोटो शेयर केला आहे. सोबत “सनी डब्बिनमध्ये सुंदर दिवस”, असे कॅप्शन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी मात केल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर आज (शुक्रवार) रंगणाऱ्या दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा आयर्लंडचे आव्हान आहे. या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेच्या दृष्टीने काही प्रयोग केले जाण्याची शक्‍यता भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्‍त केली आहे.

https://twitter.com/SDhawan25/status/1012279331853225984

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)