विराटला वाटतेय ‘या’चे कौतुक

भारताचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्याने पहिल्या डावात ९७ धावांची केली केली तर दुसऱ्या डावात त्याने १०३ धावांची खेळी केली होती. या कसोटी विजयामुळे भारताने या मालिकेत पुनरागमन केले आणि  मालिका २-१ अश्या स्थितीत आणली.

तिसऱ्या कसोटीनंतर मिळलेल्या मोकळ्या वेळ विराट पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत घालवत आहे. त्यांनी केरळ पुराचा तडाखा लक्षात घेत त्यांनी खाण्यापिण्यासाठी सामुग्री पाठवली होती. वीरूष्का जोडीचे मुक्या प्राण्यांसाठीचे प्रेम जग जाहीर आहे. त्यात विराटने आपल्या ट्विटर खात्यावरून एका कुत्र्या सोबतच फोटो शेअर केला. त्या ट्विटमध्ये त्याने ते लिहले आहे की, या सुंदर मुलाशी भेटा जो आमच्यासोबत फोटो काढताना किती संयमी होता.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना साऊथहॅम्पटन येथे ३० ऑगस्ट ते ३सप्टेंबरला होणार आहे.  पाचवा कसोटी सामना ७ सप्टेंबर पासून ओव्हल येथे होणार आहे. शेवटच्या या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय खेळाडूंची  निवड झाली  सून त्यात पृथ्वी शॉ आणि हनुमान विहारी यांना स्थान देण्यात आले तर कुलदीप यादव आणि मुरली विजय यांना आपले स्थान गमवावे लागले आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)