ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरु झाली आहे. ही मालिका सुरु होण्याचे अगोदरपासूनच शाब्दिक युद्ध सुरु झाले होते. स्टीव्ह वॉ , मिचेल जॉन्सन अश्या मातब्बर माजी खेळाडू मैदानाच्या बाहेरून सल्ले देत आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाचे आणखी एक माजी खेळाडू इयान हेली यांनी देखील यात उडी घेतली आहे. परंतु, त्याने भारताचा कर्णधार विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
भारत हा कोणत्याच बाचाबाचीची सुरुवात करत नाही आणि विरोधी संघाने जर त्यांची सीमा ओलांडली तर आत्मसन्मानासाठी त्याचे योग्य ते उत्तर देण्यास समर्थ आहे, या विराटच्या वक्तव्याबाबत बोलताना इयान हेली म्हणाले, कर्णधार विराट कोहली हा सध्या ज्या प्रकारे मैदानावर वावरतो आहे त्यातून स्पष्ट होती की क्रिकेट कसे आदर भावनेने खेळायचे असते. विरोधी संघाचा आणि त्यांच्या खेळाडूंचा आदर राखायला हवा हे विराट शिकलेले आहे. असेही हेली यावेळी म्हणाले. हेली यांनी असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियातील एक प्रसिद्ध संकेतस्थळा दिलेल्या मुलाखतीत केले आहे. विराटच्या मैदानावरील वागणुकीवर याअगोदर टीका करणारे हेली त्याची प्रशंसा करत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातन 2017 मध्ये भारतात झालेल्या कसोटी मालीकेतीलक एका सामन्यानंतर विराट म्हणाला होता की, तो कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा या संनयनांतर मित्र नसणार आहे. या विषाणावर बराच गोधळ झाल्यानंतर विराटने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले की, त्याचे वक्तव्य हे बदलून पुढे आणले गेले आहे. परंतु, इयान हेली याने त्याबाबतीत विराटवर जाहीर टीका केली होती. पुढे बोलताना हेली म्हणाले, त्या घटनेनंतर विराटच्या वागणुकीत खूपच बदल झाला आहे आणि तो विरोधी संघाचा आदर राखायला शिकला आहे. खेळाची नैतिकतेला अनुसरूनच तो मैदानात वावरत आहे. मी पाहिल्यापैकी विराट हा सर्वोत्तम फलंदाज आहे. मी त्याच्या प्रगतीने खूप खुश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेबाबत बोलताना हेली म्हणाले, ही मालिका खूप रोमांचकारी होईल यात काहीच शंका नाही. मला वाटत नाही की, या मालिकेत काही बाचाबाची होईल. ऑस्ट्रेलिया संघ हा सध्या खराब कामगिरी करत आहे परंतु, ते या मालिकेत प्रगती करतील. असेही त्यांनी पुढे सांगितले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा