#विरंगुळा : बॅनरचा बोलबोला 

– सुजाता निंबाळकर

सद्याला खुराड्यातून येताना राधाबाईंनी बघितला आणि मोठ्यांन बोंब ठोकली.
“”आर कोण रं हाये चोरटा सोकवलेला. त्या गोष्टीतल्या म्हातारीच्या कोल्ह्यावानी. मी म्हणते, रोज अंडी कुठं जातात.. कुठं जातात. मला वाटत होतं की कदाचित नागच खाऊन जात असल. पण ह्यो सरपटणारा नागोबा हाय. होयच; सोकवलेला दिसतोय.
“”अहो राधाकाकू, मी कशाला तुमची अंडी नेऊ” सद्या घाबरत बोलला.
“”माझी अंडी? म्हणजे काय मी अंड्यात बसते का?”
“”तसं नाही, तुमच्या खुराड्यातील अंडी म्हणतो मी.’ तेवढ्यात राधाकाकूंनी सद्याचा शर्ट ताणून धरला आणि त्याच्यावर चवताळून गेली.
“”आता कायदा हातात नको म्हणून तुला मी काय करीत नाय. पण तुझ्या नावाची कंपलेंट तरी देऊन येते. अंडीचोर. कोंबड्याचोर कुठला”
राधाकाकूने सद्याची कॉलर अशी धरली की त्याला ओढत ओढत पोलीस स्टेशन गाठलं.
“”साहेब याला कोंबड्यांची अंडी चोरताना पकडलंय मी. आणि अधून मधून कोंबड्यांवरसुद्धा हात साफ करतो. याला तुरुंगात टाका साहेब”

-Ads-

“” हे खरं नाही साहेब” मी माळकरी माणूस अंडी कसा चोरेन”
सद्याची साहेबांनी चांगलीच फिरकी घेतली. तरी देखील सद्या खरा बोलेना
“”साहेब मी अंडी चोरलीच नाही”
“”नाही काय म्हणतो मीच याला पकडलाय. खोटारडा कुठला”
“”जणू दरोडेखोर पकडल्यावानी बोलताय राधाकाकू”
“”अंडी चोरण्याचा मुद्दाच नाही, तर माल कसा बाहेर काढू”
“”सद्या आतापर्यंत किती अंडी खाल्लीस”
“”साहेब त्याचा हिशोब मी तुम्हाला उद्या करून सांगतो.”
“”म्हणजे तू अंडी चोरत होतास तर…”

सद्या घाबरला आणि ओशाळलेल्या नजरेने पाहू लागला.
“”साहेब अंडी चोरण्याचा माझा उद्देशच नव्हता”
“”मग खुराड्यात जावून काय सोनं चोरण्याचा उद्देश होता का तुझा”
“”नाही साहेब, तुम्हाला सहीसलामत बाहेर काढायचं होतं मला”
“”मला बाहेर काढायचं होतं म्हणजे काय माझ्या घराला आग लावून देणार होतास की काय? थांब, जरा दोन काठ्या मोडल्या की तोंड बंद होईल”
“”नाही साहेब, तसली कामं करणारा मी गुन्हेगार नाही. मी सभ्य गृहस्थ अहे. मला आईने चांगले संस्कार दिलेत म्हणून तर तुमच्या मदतीला आलो मी”

“” माझ्या मदतीला. मी कुठं जाळ्यात अडकलो, का कशात सापडलो”
“” तुम्ही पिंजऱ्यातच होता. ह्या सत्त्याच्या डोळ्यानी बघितलं मी तुम्हाला. तुम्हाला रोज वाचवण्याचा प्रयत्नातच पहिलं अंडं हाताला लागायचं. मग ते फुटल्यावर… आवाज झाल्याव… त्यामुळे ते अंड ठेवायला मी घरात जायचो.
“”म्हणजे रोज अंडी चोरत होतास तर?”
“”साहेब, तुम्हाला मी किती दिवस म्हातारीच्या खुराड्यात बघतोय. तुम्हाला किती वाचवण्याचा प्रयत्न केला मी”
आता म्हातारी चांगलीच गरजली
“”खोटारडा मेला. आता पकडल्यावर काही तरी नाटक सांगायला लागलाय. नाटक कंपनीत काम करीत व्हतास की काय?”
“”बघू, नाटक तुम्ही करताय की मी?’ साहेबांना त्यांच्या डोळ्यांनीच बघू द्या”

सद्या साहेबांना घेऊन खुराड्याजवळ गेला. सद्याला पाहून कोंबडीने जोरात ओरडायला सुरुवात केली. सद्यानं झटकन कोंबडी उचलून तिची मानगूट घट्ट पकडलीं. आणि कोंबडीच्या खालचा बॅनर बाहेर ओढला. राधाकाकूंची तर बोलतीच बंद झाली. ती फक्‍त समोरचं दृश्‍य बघत होती. साहेब जोरात गरजले.
“”म्हातारडे, माझ्या बॅनरचा उपयोग निदान चांगल्या कामासाठी तरी करायचा. तू मला कोंबडीच्या खाली टाकलसं. माझ्या सर्वांगावर उपसिंचन’
“”तुमचा बॅनर मी विचारपूर्वक चांगल्या कामासाठी वापरलाय. अंड्याची कुणी चोरी करू नये. तुम्हाला पाहून सर्वजण वचकून राहतील. मला राखण करायची गरजच राहणार नाही. म्हणून तो बॅनर तीत टाकला” तर चोरालाच तुम्ही सामील झाला. कळला वठ तुमचा.
साहेबांची म्हातारीच्या बोलण्याने बोलतीच बंद झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)