ViralVideo : बेपत्ता भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाचा व्हिडीओ पाकिस्तानकडून व्हायरल…

पाकिस्तानतर्फे आज भारतावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला भारतातर्फे चोख प्रतिउत्तर देण्यात आले असल्याने पाकिस्तानचा भारतीय सैन्य दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. आज सकाळी भारतीय वायूसीमेमध्ये प्रवेश करणारे पाकिस्तानचे लढाऊ विमान PAF F-१६ हे भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाडण्यात आले आहे. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाईदरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता आहे.

दरम्यान, पाकिस्तानतर्फे भारताचे बेपत्ता विमान व वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला असून याबाबतचा एक व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटर या सोशल माध्यमावर @atif नावाच्या खात्यावरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये एका इसमास (दावा करण्यात येत आहे की हा व्यक्ती भारतीय वायुसेनेचा बेपत्ता वैमानिक आहे) कॅमेऱ्या समोर उभे करण्यात आले असून त्याला एक अज्ञात  व्यक्ती काही प्रश्न विचारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बेपत्ता भारतीय वैमानिक असल्याचा दावा करण्यात आलेली व्यक्ती आपले नाव अभिनंदन असून पाकिस्तानतर्फे आपणाला बंदी बनवल्यानंतर चांगली वागणूक देण्यात येत असल्याचे सांगताना दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्हिडिओच्या सतत्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने या व्हिडिओच्या सतत्येबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

टीप : सदर व्हिडीओ हा सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून सदर व्हिडिओच्या सतत्येबाबत दैनिक प्रभततर्फे कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही. 

https://twitter.com/exdigger59/status/1100732043762126848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)