पाकिस्तानमधील कराची मध्ये दिसला गब्बर सिंग

सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

‘शोले’ चित्रपटातील गब्बर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. गब्बर सिंगचे संवाद तुफान गाजले होते. अभिनेते अमजद खान यांनी ही भूमिका अजरामर केली होती. ‘यहासे पचास-पचास कोस दूर जह बच्चा रात को रोता है तो मां कहती है सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा’ हा संवाद आणि गब्बर सिंग यांना कोण विसरू शकतं. शोले या चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा भारतातच नाही तर जगभरातील लोकांच्या पसंतीस पडल्या होत्या. दरम्यान पाकिस्तान मधील कराची शहरातून एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती हुबेहुब गब्बर सिंग म्हणजेच अमजद खान यांच्यासारखा दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांनी त्या व्यक्तीचा फोटो काढून सोशल मीडीया वर व्हायरल केला आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज वाहिनीच्या माहितीनुसार हा फोटो कराची शहरातील लाड बाजारात काढला गेलेला आहे. हा व्यक्ती केसापासून ते कपड्यापर्यत शोलेच्या गब्बर सिंगसारखा दिसत आहे. शाहजहां खुर्रम नावाच्या एका ट्विटर यूजरने सुध्दा हा फोटो शेअर केला आहे.
तसेच गेल्या काही दिवसापासून भारतात सुध्दा व्हाॅटसअॅपवर हा फोटो व्हायरल होत आहे. व्हाॅटसअॅप वर हो फोटो व्हायरल होत असून फोटोखाली ‘गब्बर सिंग तुळशीबागेत खरेदी करताना’ अशी फोटोअोळ लिहून व्हायरल होताना दिसत आहे.

पण प्रभात मीडिया या फोटोची स्पष्टता करत नाही आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)