लढल्याचा अभिमान पण चुकीचे फटके भोवले – विराट कोहली

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन ठरला. सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की सामना एकतर्फी न होता रंगतदार झाला याचा आनंद आहे. आम्ही आमचे 100 टक्के दिले. पण इंग्लंडची कामगिरी आमच्यापेक्षा सरस ठरल्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही हरले असलो तरी त्याचे शल्य मनात नाही त्याउलट लढल्याचा अभिमान असल्याचे विराट कोहली म्हणाला.

ठरवलेले डावपेच अंमलात आणण्यात आणि फलंदाजांनी चुकीचे शॉटस खेळल्याचा फटका आम्हाला बसल्याची कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दिली. इंग्लंडने ही कसोटी 31 धावांनी जिंकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलंदाज आणखी चांगली कामगिरी करु शकले असते पण ते धावा जमवण्यात अपयशी ठरल्याची कबुलीही यावेळी विराट कोहलीने दिली. पुढे बोलताना तो म्हणाला की, आमचा पराभव झाला असला तरी लढा दिल्याचा आनंद आहे. त्याबरोबरच पुढील कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)