उत्तरप्रदेशातील महाव गावात हिंसाचार ; दोन ठार

बुलंदशहर: उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्येचा प्रकार उघडकीला आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात एक पोलिस निरीक्षक आणि एक युवक असे दोन जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले. जमावाने तुफान दगडफेक आणि जाळपोळ केली. त्यावेळी जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

जमावाने चिंगरावती पोलिस चौकीला आग लावली. त्यात ही चौकी जळून खाक झाली आहे. या हिंसाचारात सायना पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुबोध कुमार हे ठार झाले आहेत. तथापी ते आगीत ठार झाले की जमावाने केलेल्या गोळीबारात ठार झाले याची माहिती मिळू शकली नाही. सुमीत नावाचा एक युवक मात्र गोळीबारात ठार झाला. जमावाने एका वाहनातून मरण पावलेल्या काही प्राण्यांचे अवशेष आणले होते. हे गायीचे अवशेष असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जमावाने करीत पोलिस चौकीवरच हल्ला चढवला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)