मोदींच्या सभेनंतर हिंसाचार

दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

हिंसाचाराप्रकरणी 19 जणांना अटक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाझीपूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशात जमावाने केलेल्या दगडफेकीत आज आणखी एका पोलीस कर्मचारी बळी पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाझीपूरमधल्या सभेनंतर काही निदर्शकांनी या ठिकाणी दगडफेक सुरू केली. त्यातच या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. बुलंदशहरमधील घटना ताजी असतानाच आज गाझीपूरमध्येही अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गाझीपूर येथे सभा होती. ही सभा आटोपल्यानंतर माघारी परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल सुरेशकुमार वत्स व अन्य दोनजण गंभीररित्या जखमी झाले. या तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे वत्स यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक केली असून फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती गाझीपूरचे जिल्हाधिकारी के. बालाजी यांनी दिली.

ही घटना गाझीपुरातील कठवा पुलाजवळ घडली. दगडफेकीत जीव गमवावा लागलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरेश वत्स हे करीमुद्दीनपूर पोलीस स्टेशनमध्ये सेवेत होते. वरिष्ठ अधिकारी व अन्य चार सहकाऱ्यांसह ते गाझीपूरला गेले होते. पंतप्रधानांच्या सभेसाठी जो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तिथे त्यांना ड्युटी देण्यात आली होती. दरम्यान, ड्युटी संपवून परतत असतानाच त्यांना हिंसाचाराला सामोरे जावे लागले आणि त्यातच त्यांचा बळी गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)