मुंबई : आषाढी एकादशी दिवशी प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची आज पहाटे विधिवत महाअभिषेक व पूजा केली.
महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना आज विठ्ठलाच्या चरणी तावडे यांनी केली. राज्यात पाऊस पडू दे, पीक येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी राहू दे हे हीच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केल्याचे तावडे यांनी सांगितले.