मैत्री दिनी विनोद कांबळी व सचिन तेंडुलकर यांनी एकमेकांना ‘अशा’ पद्धतीने दिल्या शुभेच्छा…

मैत्री दिनाचे औचित्य साधून भारताच्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर या आपल्या लहानपणीच्या मित्रास शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटमध्ये विनोद कांबळी आणि सचीन तेंडुलकर यांनी एकत्र पदार्पण केले होते. मैत्रीदिनानिम्मित्त ट्विटर द्वारे शुभेच्छा देताना विनोद कांबळीने आपली मैत्री जय-वीरू प्रमाणे असून तू जय तर मी वीरू आहे असे ट्विट केले होते. विनोद कांबळीच्या या ट्विटला सचिनने देखील रिट्विट केले असून आपली मैत्री अद्वितीय असल्याचे सचिनने म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)