कुस्तीपटू बंजरग आणि विनेश यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्करासाठी शिफारस

नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाने बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या कुस्तीपटूची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया याने सुवर्णपदक तर विनेश फोगाट हिने कांस्यपदक पटकाविले होते.

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याच्यासह हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर विरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ध्यानचंद पुरस्कारासाठी भीम सिंग आणि जय प्रकाश यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1122758748097871873

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)