‘बुलडाणा’ जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा,अन्यथा….

बुलडाणा – येत्या 12 तारखेला (शनिवारी) राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. याच प्रार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊ करावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. नामकरण न झाल्यास मोठे आंदोलन करू, असा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे.

जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. आम्ही वेळोवेळी मंत्रीपदाची मागणी करूनही सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं, अशी खंतदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महायुतीमध्ये सत्तेत असतानाही मागच्या चार वर्षामध्ये मेटेंना भाजपने मंत्रीपद दिले नसल्यामुळे ते नाराज आहेत. पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेले मेटे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. विनायक मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)