विक्रमसिंगे यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ-विवाद संपुष्टात

कोलंबो, (श्रीलंका): रानील विक्रमसिंगे यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली, अशा प्रकारे अखेर 51 दिवस चाललेल्या श्रीलंकेतील राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरसेना यांनी आज एका साध्या समारंभात रानील विक्रमसिंगे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली, आणि श्रीलंकेच्या राजकारणाची गाडी पुन्हा रुळावर आली आहे.

विक्रमसिंगे याना पदच्युत करून सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी नियुक्त केलेल्या महिंद्रा राजपक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करता आले नाही. उलट त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव पास करण्यात आला आणि न्यायाल्यानेही महिंद्रा राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास मनाई केली होती. सिरीसेना यांनी संसद भंग करून पुन्हा निवडणुकीची तयारी चालवली होती. मात्र न्यायालयाने अध्यक्ष सिरीसेना यांची ही कारवाईही असंवैधानिक ठरवली. बहुसंख्य खासदार ठामपणे विक्रमसिंगे यांच्या पाठीशी राहिले होते. या सर्व परिस्थितीत अध्यक्ष सिरीसेना यांना विक्रमसिंगे यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

26 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रपती सिरिसेना यांनी रानील विक्रमसिंगे यांची तडकाफडकी पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून महिंद्रा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय भूकंप झाला होता. मात्र न्यायालयानेही राष्ट्रपतींची कारवाई घटनाबाह्य ठरवल्याने पेचप्रसंग सुट्‌ला आहे. भारत, अमेरिका, युरोपियन युनियनसह साऱ्या जगाचे लक्ष श्रीलंकेतील घडामोडींकडे लागलेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)