विखे पाटील लवकरच मुख्यमंत्री, आणि कपिल पाटील शिक्षणमंत्री होतील !

 इतिहास बदलू पाहणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे आवाहन ; सत्तेचे स्वप्न रंगले !

नगर: अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने शिक्षण परिषदेत आयोजित केली होती. या परिषदेत सुरुवातीला काही वक्त्‌यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील शिक्षणमंत्री होतील, असे वक्तव्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानांतर विखे मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांच्याशी भांडायचं सोडणार नाही, असे कपिल पाटील म्हणाले. पुढे भाषणाला उभे राहिलेल्या विखेंनी पुढे कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे. राज्यात आतापर्यंत कुठलाही शिक्षक आमदार मंत्री झाला नाही. मात्र ते भाग्य कपिल पाटलांना मिळणार, असे म्हणत पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

पाटील म्हणाले, “भारतीय जनता पक्ष सरकारने संविधानाने दिलेले अधिकार सर्वसामान्यांकडून काढून घेतले. सर्वांना पेन्शनचा अधिकार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आज मात्र त्यांना आपण विसरत चाललो आहोत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना जुनी पेन्शनचा कायदा रद्द करून नवीन कायदा आणला. नवीन कायद्यानुसार आपले पैसे सरकारने मार्केटमध्ये गुंतविले. काम करतांना जुन्या सहकाऱ्याला एक पेन्शन तर नवीन सहकाऱ्याला दुसरी पेन्शन मिळते.’ शिक्षकांचे विविध प्रश्‍न आहेत.

अनुदान नसल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत. भाजपची प्रेरणा ही संविधान नसून, हेडगेवार व गोळवलकर आहेत. मोदींनी सत्तेवर येतांना वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्‍वासन दिले होते. मात्र नोटबंदी, जीएसटीने सव्वा कोटी जनतेचा रोजगार हिरावला गेला. शिक्षणमंत्री असतांना विखेंनी जी यंत्रणा सुरळीत लावली होती, त्या यंत्रणेला मोडीत काढण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. पाठ्यपुस्तक मंडळावरील जुन्या, जाणत्या व्यक्तींना काढून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना त्यात घेण्यात येत आहे. त्यातून आपली ओळख पुसण्याचं काम होत असून, इतिहास बदलू पाहणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)