‘प्राध्यापकांच्या संपात हस्तक्षेप करुन मार्ग काढा’-ना. विखे पाटील

File Photo

शिर्डी – महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाकडून गेल्या महिनाभरापासून राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू आहे. संपामध्ये हस्तक्षेप करुन सरकारने प्राध्यापकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती विधानसभेचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सरकार संपाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. या संपाबाबत कोणत्याही संवेदना नाहीत, असा थेट आरोपही ना. विखे यांनी केला. राज्यातील विविध विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक दि. 25 सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. ऐन परिक्षेच्या काळात हा संप सुरु आहे, महाविद्यालयातील कामकाज ठप्प आहे.

-Ads-

शिक्षक-प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवावी, विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेतनव्यवस्था नियमित करावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, बेकायदेशीर कपात केलेले 71 दिवसांचे वेतन अदा करावे, जूनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या प्राध्यापक संघटनेच्या आहेत. मात्र मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असून, संप फोडण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही विरोधीपक्ष नेत्यांनी केली.
विरोधी पक्षात असताना शिक्षक आणि प्राध्यापकांचा खोटा कैवार घेवून बोलणारे मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री आता मात्र प्राध्यापकांच्या संपाबाबत काही बोलण्यास तयार नाहीत.

संपाचा महाविद्यालयांच्या कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेवून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, मागण्या मान्य करण्यासाठी गांभिर्याने विचार करावा अशी मागणीही विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)