विखे-पाटलांकडून राजीनामा दिला नसल्याचा खुलासा !

File Photo

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाली होती. दरम्यान अद्याप मी राजीनामा दिला नसल्याचे विखे-पाटलांनी स्पष्ट केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय यांच्या पक्षप्रवेशाने अखिल भारतीय कॉंग्रेसला चांगलेच सावध केले आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटलांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे.

नगर दक्षिणमध्ये गेल्या तीन वर्षांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीची पेरणी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. विखे पाटील हे कॉंग्रेसमध्ये आहेत. आघाडीत खलबते करून ही जागा पुत्रासाठी पदरात पाडून घेता येईल, अशी तयारी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र ही जागा कॉंग्रेसला न सोडता, ती राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवायचीच, अशा तयारीत असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)