माईक स्नायडरला नॉकआऊट करत मिळवला विजय
नेवार्क – बॉक्सिंगमधील भारताचा पहिला ऑलिम्पिक आणि जागतिक पदकविजेता खेळाडू विजेंदर सिंग दुखापतीनंतर बॉक्सिंगमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे. त्याने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करत बॉक्सिंगच्या करियरमधील सलग अकरावा विजय मिळवला आहे.
रविवारी पहाटे विजेंदर आणि स्नायडरमध्ये अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. विजेंदरने स्वायडरला आठ राऊंडच्या मिडलवेट कॉन्टेस्टमध्ये नॉकआऊट करत सामना आपल्या नावे केला.
दुखापतीमुळे वर्षभर बॉक्सिंगपासून दुर असलेल्या विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट करत आपले आकरावे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे आतापर्यंत विजेंदर एकदाही प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत झालेला नाही. विजेंदरने आतापर्यंत 11 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यातील 8 सामन्यात त्याने प्रतिस्पर्ध्यावर नॉकआऊटद्वारे विजय मिळविला आहे.
या सामन्यानंतर 33 वर्षीय विजेंदरने सर्वांचे आभार मानत या लढतीचा व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट केला आहे. “गान अर्पित, प्राण अर्पित, रक्त का कण-कण समर्पित। चाहता हूं देश की धरती, तुझे कुछ और भी दूं।,’ विजयानंतर त्याने अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.